काँग्रेस रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या वतीने तरुणांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करावे करण्यात यावे__राशिद शेख यांचे प्रतिपादन.
सोलापूर :-- काँग्रेस पक्षाने रोजगार स्वयंरोजगार सेल गठीत केला असून युवा पिढीला आर्थिक सक्षम करण्याबरोबर समाज सेवा करण्याच व्यासपीठ उपलब्ध करून दिली आहे. याचा पुरेपूर फायदा प्रतेक कार्यकर्त्यांनी घ्यावे शिवाय समाजातील प्रत्येक व्यक्तीला आत्मिनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना समजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावे. प्रदेश अध्यक्ष योगेश पाटील यांच्या आदेशाने माजी केंद्रीय ग्रहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणिती ताई शिंदे व जिल्हाअध्यक्ष डॉ. धवलसिंह दादा मोहिते पाटील यांच्या आशीर्वादाने माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे माजी आमदार विश्वनाथ चाकोते सोलापूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब शेळके सोलापूर जिल्हा अल्पसंख्या विभाग जिल्हा अध्यक्ष वाशिम पठाण
आहेरवाडीचे एक धडाडीचे कार्यकर्ते अप्पू शेख यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयरोजगार सेल जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांनिमित्ताने झालेल्या नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.
अपू शेख हे बेरोजगारांची व्यथा जाणणारे युवा कार्यकर्ते असून भविष्यात सोलापुर जिल्ह्यातील युवकांना रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले तर पक्षाचे संघटन मजबूत होईल असेही राशिद शेख यांनी म्हटले आहे.
यावेळी जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग सरचिटणीस अकबर शेख भीम संघर्ष दल प्रमुख गौतम कांबळे ज्येष्ठ नेते रियाझ नाईकवाडी पश्चिम महाराष्ट्र सचिव अब्दुल रज्जाक कादरी जिल्हा काँग्रेस सचिव मोहम्मद शेख नूरअहमद नालवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


