शिंदे-फडणवीस सरकारच्या वतीने गावोगावी दिवाळीपुर्वी आनंदाचा शिधा पोहच
मंगळवेढा : राज्यातील नव्याने स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारच्या वतीने राज्यभरातील गोरगरीबासाठी देण्यात आलेल्या 100 रुपयातील आनंदाचा शिधा मंगळवेढा ताल्ाुक्यात 23 हजार 559 गोरगरीबापर्यत पुरवठा विभागाने 106 रेशन दुकानदाराच्या माध्यमातून दोन दिवसरात्री प्रयत्न करुन दिवाळीपुर्वी पोहच करण्याची भूमिका बजावली.तालुक्यातील 106 दुकानदाराच्या माध्यमातून अंतोदय ,प्राधान्य,बी.पी.एल कार्डधारकासाठी राज्यात नव्याने सत्ताबदल करुन तयार झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिवाळीपुर्वी कार्डधारका 100 रुपयात एक किलो तेल,प्रत्येकी एक किलो प्रमाणे साखर,रवा,दाळ या चार वस्तू देण्याचा निर्णय घेतला
परंतु या वस्तू दिवाळीपुर्वी ग्रामीण भागातील गोरगरीब कार्डधारकापर्यत जाणार का याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होती मात्र मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर व तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करीत दोन रात्री व दिवसा परिश्रम घेत तालुक्यातील 106 दुकानपर्यत 23 हजार 559 कार्डधारकांना नव्या सरकारचा आनंदाचा शिधा पोहच केला.त्यामध्ये महसूल नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे,निवासी नायब तहसीलदार सुधाकर धाईजे,पुरवठा निरीक्षक हणमंतराव पाटील,अव्वल कारकून नामदेव गायकवाड,महसूल सहायक शिवाजी भोसले हे नियोजन केले तर पुरवठा निरीक्षक हनुमंतराव पाटील हे स्वतः गावोगावी वाहनातून शिधा पोहच करून सदरचा शिधा तात्काळ कार्ड धारकांना वितरित करण्याबाबतच्या सूचना रेशन दुकानदारांना दिल्या.
यामध्ये गावनिहाय मिळालेला शिधा पुढीलप्रमाणे अकोला 199,आंधळगाव 700,अरळी 299,आसबेवाडी 119,बावची 176,ब्रम्हपुरी 308,भोसे 821,नागणेवाडी 104,भाळवणी 310,भालेवाडी 175 बोराळे 545,चिक्कलगी 216,देगाव 100,धर्मगाव 156,ढवळस 198,डिकसळ 126,डोंगरगाव 241,फटेवाडी 114,गणेशवाडी 271,घरनिकी 219,गोणेवाडी 374,गुजेगाव 355,हाजापूर 210,हिवरगाव 134,हुन्नुर 283,हुलजंती 648,जालीहाळ 210,जंगलगी 159,जित्ती 188,जुनोनी 159,कचरेवाडी 327,कागष्ट 77,कात्राळ 185,खडकी 161,खोमनाळ 279,खवे 150,पडोळकरवाडी 179,खुपसंगी 460,लमाणतांडा 190,लवंगी 280,लक्ष्मीदडीवडी लेंडवेचिंचाळे लोणार माचणूर महमदाबाद हु. 290,महमदाबाद शे.102, माळेवाडी 57,मानेवाडी 229 ,मल्लेवाडी 143,मारोळी 182,मरवडे 689, मारापूर 350,मेटकरवाडी 75,मुढवी 210,मुढेवाडी 201,नंदेश्वर 738,डोणज 250,नंदूर 495,निंबोणी 451, पाठखळ 363, पौट 165,रडडे 569,रेवेवाडी 222,सलगर बु 515,सलगर खु 195,शेलेवाडी 112,शिरसी 250,शिरनांदगी 290,सिध्दनकेरी 67,सिध्दापूर 146,सोडडी 195,तळसंगी 450,शिवनगी 120,तांडोर 126,तामदर्डी 153,रहाटेवाडी 109,उचेठाण 238,येड्राव 271,येळगी 108,बठाण 312,डोणज 231,मंगळवेढा 1789

