काय आहे सोलापूर शहरात राष्ट्रीय महास्वराज भूमी पार्टीचा मिशन.?



 राष्ट्रीय महा स्वराज्य भूमी पार्टी हा एक नवीन पक्ष आहे ज्याचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहिद भाई सिद्दीकी आहेत.  आणि सरचिटणीस बाबूभाई रंगरेज आहेत, हिंदू मुस्लिमांना सोबत घेऊन, गरीब, वंचितांना रोजगार, प्रत्येक घरात रोटी, कपडा आणि रोजगार, विशेषतः गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण, मजुरांना रोजगार, या पक्षाचा उद्देश आहे. प्रत्येक घरात लाईट, पाणी, गल्ली बोळात , नाली, रस्ता, ड्रेनेज, महिलांची सुरक्षा, महिलांचा सन्मान,  आणि तरुणांना रोजगार, घरा-घराचा विकास या सर्व प्रश्नांवर हा पक्ष काम करत आहे.

 सोलापूर शहरातील महापालिका निवडणुकीत राष्ट्रीय महास्वराज भूमी पक्ष सर्व प्रभागात आपले उमेदवार उभे करणार आहे.  ज्यामध्ये सर्व जाती धर्माच्या घटकांना पक्षाकडून तिकीट दिले जाणार आहे.

 पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे ध्येय फक्त आणि फक्त विकास आहे, हिंदू मुस्लिम समाजातील सर्व जाती घटकातील लोकांना सोबत घेऊन केवळ विकासाच्या मुद्द्यावर काम करणे ही पक्षाची विचारधारा आहे.

 सूत्रांच्या माध्यमातून पाहिल्यास सोलापूर शहरात या पक्षाचे कामकाज चांगलेच सुरू आहे.

 काही दिवसांत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी सोलापूर शहरात एक मोठा मेळावा घेणार आहेत.

  ज्यामध्ये सर्व उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते, अपंग संघटना आणि सर्व जाती-धर्माच्या महिला आणि धार्मिक नेत्यांना बोलावण्यात येणार आहे, ज्यामध्ये पक्षाच्या उद्देशावर आणि कोणत्या मुद्द्यावर पक्षाची वाटचाल आहे, याचा मोठा निर्णय घेतला जाणार आहे. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत निवडणूक लढणार.सोलापूर शहरात सध्या पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आपापल्या स्तरावर काम करत आहेत.प्रत्येक रस्ते वस्त्या गल्ल्या वार्डच्या विकास हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे.

 सूत्रांच्या माध्यमातून अशी माहिती मिळत आहे की येणाऱ्या महापालिका निवडणुकीत या पक्षाला चांगले नगरसेवक निवडून येण्याचे संकेत आहेत.

 राष्ट्रीय महा स्वराज पक्ष यावेळी सोलापूर महापालिका निवडणुकीत सर्व प्रभागातून आपले उमेदवार उभे करणार असून उमेदवारांना विजयी करण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ सोलापूर शहरात कसून प्रयत्न करणार आहेत.