सोलापूर पोलीस आयुक्त कार्यालयात राष्ट्रीय एकता दिवस
व दक्षता जनजागृती सप्ताह साजरा
31 ऑक्टोबर 2022 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व स्वर्गीय इंदीरा गांधी यांची पुण्यतिथी असल्याने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस तसेच स्वर्गीय इंदीरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी पोलीस आयुक्त कार्यालयात श्री राजेंद्र माने, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल आणि स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. मा. पोलीस आयुक्तांनी पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना राष्ट्रीय एकता, अखंडता, व सुरक्षा अबाधित राहण्यासाठी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली.
तसेच दि. 31 ऑक्टोबर, 2022 ते 06 नोव्हेंबर 2022 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह (Vigilance Awareness Week) " भ्रष्टाचारमुक्त भारत विकसित भारत" (Corruption free India for a - developed Nation) ही संकल्पना घेऊन साजरा करण्यात येणार असल्याने आज दि. 31 ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात श्री राजेंद्र माने, पोलीस आयुक्त, सोलापूर यांनी भ्रष्टाचार निर्मुलनाची प्रतिज्ञा पोलीस आयुक्तालयातील उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांना दिली.
यासोबतच उपस्थित पोलीस अधिकारी व मंत्रालयीन कर्मचारी यांना भ्रष्टाचार निर्मुलन संदर्भात मा. श्री. भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल आणि मा. श्री. एकनाथ संभाजी शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांनी दिलेली शपथ संदेश वाचून दाखविण्यात आले.
सदर कार्यक्रमास श्री राजेंद्र माने, पोलीस आयुक्त, डॉ. दिपाली धाटे, पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय), डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), बापू बांगर, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे / विशा) पोलीस आयुक्तालयातील सहा. पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार आणि मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.


