सोलापूर मधील गुंठेवारी चा प्रश्न लवकरच मार्गी लागणार यशवंत पवार
सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर मधील हद्दवाड विभागातील गुंठेवारी बाबत खरेदी विक्रीला परवानगी नसल्याने हद्दवाढ विभागातील नागरिकांना अनेक अडचणीला तोंड लागत आहे राज्य सरकार ने खरेदी विक्रीवर निर्बंध लादल्याने हद्दवाढ विभागातील अनेक खरेदी व विक्रीचे व्यवहार ठप्प झाले असून हद्दवाढ विभागातील जवळपास 90% मिळकती गुंठेवारीच्या असून मागील अनेक महिन्यापासून राज्य सरकारने हद्दवाढ विभागातील खरेदी विक्रीला परवानगी दिली नसल्याने हद्दवाढ विभागातील मिळकत धारकानां आपल्या मिळकती कवडीमोल भावाने विकाव्या लागत आहेत त्याच बरोबर अनेकांच्या मुलांचे उच्चशिक्षण व विवाह सारखे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत
*गुंठेवारी बाबत ग्राहक कल्याण फौंडेशन चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांनी सोलापूर मधील गुंठेवारी बाबत मा जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहार केलेला होता*
या अनुषंगाने सोलापूर चे मुद्रांक जिल्हा अधिकारी यांनी महाराष्ट्र नोंदणी नियम 44 मधील खंड (ई ) प्रमाणे धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व एकत्रिकरणं करण्याबाबत अधिनियमातील तरतुदी बाबत मा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी 12/7/2021 रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे त्या अनुषंगाने सदर कार्यालयाच्या आधीन राहुन दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे कामकाज करण्यात येत आहे ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांच्या अर्जातील मागणीचा लवकरच विचार करून शहर व हद्दवाढ भागातील काम कामकाजा बाबत राज्य सरकार किंवा वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश प्राप्त होताचं हद्दवाड
विभागातील खरेदी विक्री बाबत कार्यवाही करणार असल्याचे सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी गिते यांनी ग्राहक कल्याण फौंडेशन सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे
