नळदुर्ग येथे न्याय व्यवस्था सुरू करा- मनसे,जनहित - विधी कक्षाची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी



-------------------------

नळदुर्ग - येथे दिवाणी व फौजदारी न्याय व्यवस्था सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित कक्ष व विधी विभागाने मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे,निवेदनात असे म्हंटले आहे की,नळदुर्ग हे एक ऐतिहासिक शहर असून निजाम राजवटीत येथील किल्यात मुन्सीफ कोर्ट(हायकोर्ट,जिल्हा - तालुका कोर्ट) होते,पूर्वी नळदुर्ग हे एक सुभा होते, या ठिकाणच्या किल्यातिल मुंसीफ कोर्टाची इमारत आजही सुस्थितीत असून ऐतिहासिक साक्ष देत आहे, तुळजापूर तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर ही नळदुर्गचे महत्व कमी होऊ नये म्हणून सन १९५१ पर्यंत न्याय व्यवस्था नळदुर्ग किल्यातच होती,त्यानंतर तुळजापूर येथे न्याय व्यवस्था सुरू करण्यात आली, तुळजापूर येथील कोर्टामध्ये दर महिना  दिवाणी व फौजदारी स्वरूपाच्या जवळपास अंदाजे २०० हून अधिक केसेस या नळदुर्ग हद्दीतील असून, तुळजापूर कोर्टात येण्या जाण्यासाठी लोकांचा वेळ,मोलमजुरी करून गोळा केलेला पैसा ही खर्च करावा लागत आहे, नळदुर्ग शहराची लोकसंख्या ३० - ३५ हजाराच्या वर आहे तसेच परिसरातील लोकसंख्या जवळपास दीड लाखाच्या आसपास आहे,शहरात पोलीस ठाणे आहे,त्या अंतर्गत एक आऊट पोस्ट इटकळ येथे आहे,नळदुर्ग पोलीस ठाण्यात तीन पोलीस निरीक्षक व दोन सहा पोलीस उपनिरीक्षक आहेत,पोलीस ठाण्या मार्फत दररोज एकापेक्षा जास्त गुन्हे नोंदविले जातात,नळदुर्ग व परिसरातील दिवाणी व फौजदारी असलेल्या केसेस साठी लोकांचा वेळ व पैसा वाचून त्यांना न्याय मिळावा,तसेच न्याय व्यवस्था गतिमान होण्यासाठी ऐतिहासिक नळदुर्ग शहरात दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू करण्यात यावे अशी मागणी मनसे जनहित कक्ष व विधी विभागाकडून मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे,निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे,जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे जिल्हा उपाध्यक्ष ऍड.अविनाश साळुंखे,महेश जाधव,जनहित कक्ष व विधी वि.ता.अध्यक्ष अड.मतीन बाडेवाले तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,शहराध्यक्ष अलीम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,शहर संघटक रवि राठोड यांच्या स्वाक्षरी आहेत.