पत्रकार शशिकांत वारशे खून प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा द्या.
रत्नागिरी जिल्ह्यात अन्याय विरुद्ध धडाडणारी तोफ म्हणून ओळखले जाणारे दै महानगरी टाईम्सचे झुंजार पत्रकार शशिकांत वारिशे यांची भ्याड हत्या करण्यात आले असून या हत्येचा पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र वतीने आम्ही तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत.
झुंजार पत्रकार शशिकांत वारिशे सातत्याने रिफायनरी विरोधी जनमताचा आवाज बुलंद करीत होते. त्याचबरोबर रिफायनरी संदर्भात आपल्या लेखणीच्या माध्यमातून नेहमीच आवाज उठवत होते, त्यांची शेवटची बातमी दि.०६ फेब्रुवारी २०२३ च्या दै. महानगरी टाईम्स मध्ये प्रसिद्धी झाली होती. आंगणेवाडी यात्रेनिमित्त पंतप्रधान मोदींसह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बॅनरवर गंभीर गुन्हयातील आरोपीचे फोटो असल्याचे ती बातमी होती. तो संशयित आरोपी म्हणजेच रिफायनरी प्रस्थापित होऊ शकणाऱ्या भागात जमिनींचे व्यवहार करणारा पंढरीनाथ आंबेरकर असल्याचे माहिती मिळत असून याच आंबेरकरने सोमवार दि. ०६ फेब्रुवारी दुपारी १ वाजता राजापूर महामार्गावरील पेट्रोल पंपावर पत्रकार शशिकांत वारिशे यांना पाहिले व बेसावध असलेल्या पत्रकार वारिशे यांच्या दुचाकीवर आपले चारचाकी वाहन घालून पत्रकार वारिशे यांची हत्या केल्याचा आरोप आंबेरकर यांच्यावर असून पत्रकार वारिशे यांना उपचारासाठी रत्नागिरी येथे आणण्यात आले. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. या जीवघेण्या हल्यात पत्रकार शशिकांत वारिशे बेशुद्ध अवस्थेतून बाहेर आलेच नाही. सकाळी सात वाजता त्यांची प्राणज्योत माळवली. पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या म्हणजे लोकशाहीवर निघृण हल्ला आहे. अशा प्रकारे दिवसा ढवळ्या पत्रकारांची हत्या होणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक असून लोकशाहीला मारक आहे. तरी आरोप्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी पत्रकार सुरक्षा समिती सोलापूरच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी यांना मुख्यमंत्र्यांच्या नावावर निवेदन देण्यात आला.
त्यावेळी पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर अध्यक्ष राम हुंडारे, पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख ,पत्रकार सुरक्षा समिती सदस्य श्रीकांत जाधव, साप्ताहिक यश संघर्षचे सहसंपादक विजय कुमार चव्हाण उपस्थित होते.


