लता साळुंखे यांची ह्यूमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडिया सोलापूर शहराध्यक्ष (महिला विभाग) पदी नियुक्ती
सन्मान त्यागाचा अन संघर्षाचा
लता साळुंखे यांचा सत्कार
सोलापूर-( प्रतिनिधी ) सर्वसामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून वंचित पिढीत घटकाला त्याच बरोबर समाजातील तळागळातील लोकांना आपल्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणारे अन्याय विरोधात आपली चळवळ उभा करून न्याय देण्याची भूमिका प्रखर पणे पार पाडून प्रशासन दरबारात नेहमीच आपला आवाज निर्माण करणारे वंचितांचे अश्रू पुसणारे लता साळुंखे यांची ह्यूमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडिया सोलापूर शहर अध्यक्ष (महिला विभाग )म्हणून बाळकृष्ण सदाफुले माहिती अधिकार कार्यकर्ते उप प्रचार प्रमुख यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे सत्कार करण्यात आला यावेळी ह्यूमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडिया चे जिल्हाअध्यक्ष सादिक शेख, ह्यूमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हा संघटक नागनाथ गणपा, ह्यूमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे शहर अध्यक्ष बिपिन दीड्डी, ह्यूमन राईटस फेडरेशन ऑफ इंडियाचे संपर्कप्रमुख आरिफ शेटे , अब तक न्यूज चे संपादक व शहर उपाध्यक्ष मेहबूब कादरी व जुबेर शेख इत्यादी उपस्थित होते.

