राष्ट्रीय महास्वराज भूमी पार्टीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी आन्सर तांबोळी यांची नियुक्ती



सोलापूर (प्रतिनिधी ) सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी वंचित पीडित घटकाच्या उद्धारासाठी गेली अनेक वर्षापासून पत्रकारिता करत असलेले  सोलापूर  शहरातील गोरगरीब व अनाथ मुलांना  शालेय साहित्य अन्नदान रक्तदान सारखे समाज उपयोगी कार्यक्रम बी एस फाउंडेशन च्या वतीने सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे ज्येष्ठ पत्रकार व पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) यांची राष्ट्रीय महास्वराज भूमी पार्टीच्या सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून राष्ट्रीय महास्वराज भूमी पार्टी चे राष्ट्रीय प्रवक्ता शाहिद सिद्दीकी महाराष्ट्र प्रभारी बाबूभाई रंगरेज यांच्या हस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला 



तसेच पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी राष्ट्रीय महास्वराज भूमी पार्टी चे सह प्रभारी यशवंत पवार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष युवा आघाडी चे सादिक शेख  मोहंमद तांबोळी आबीद तांबोळी शाहरुख तांबोळी फारूक तांबोळी समीर तांबोळी अमीर तांबोळी उपस्थित होते.