चाँदसाहाब मुजावर यांची राष्ट्रीय महास्वराज भूमी पार्टी वाहतूक आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती.
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले चांदसाहाब मुजावर, ज्यांनी सोलापूर जिल्ह्यातील गरीब व वंचित अल्पसंख्याक जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी गेली 30 वर्षापासून प्रयत्न करत आहे प्रत्येक गरीब व्यक्तीच्यादुःखात आणि अडी अडचणीत आपल्या वतीने होईल ते मदत करून समाजातले लोकांना एक ईश्वरांची भेट म्हणून काम करत आहे. या कामाची दखल घेऊन चांदसाहाब मुजावर यांची राष्ट्रीय महास्वराज्य भूमी पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष वैशाली गोसावी यांनी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष वाहतूक आघाडी या पदावर नियुक्ती केली आहे, .
चाँद साहाब मुजावर यांनी गेल्या ३० वर्षांपासून सोलापूर शहर व जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रात गरीब व वंचित अल्पसंख्याकांना मदत करून समाजोपयोगी कार्य करून केवळ सोलापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला आहे.
चांदसाहाब मुजावर यांनी गेल्या तीन दशकात सोलापूर व महाराष्ट्रातील वाहतूक संघटना व इतर सामाजिक संस्था व राजकीय क्षेत्रामध्ये काम केले आहे
सोलापूर शहरात चांदसाहब मुजावर यांचे सामाजिक कार्य आजही खूप मोठे आहे.
नुकतच राष्ट्रीय महास्वराज्य भूमी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांची राष्ट्रीय महास्वराज्य भूमी पक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष वाहतूक आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
चांद साहब मुजावर हे एक सोलापूरच नाही अख्ख्या महाराष्ट्रासाठी एक धाडसू आणि निडर बेबाक सामाजिक राजकीयक्षेत्रामध्ये एकनिष्ठ कार्यकर्ता आहे.
आज राष्ट्रीय महास्वराज भूमी पक्षाचे राष्ट्रीय प्रमुख शाहिद भाई सिद्दीकी, राष्ट्रीय सचिव बाबूभाई रंगरेज, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष (युवा आघाडी) सादिक शेख सोलापूर जिल्हाध्यक्ष (युवा आघाडी) मेहबूब कादरी आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


