कुंभारी हद्दीतील अवैधरित्या मुरूम उपसा बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल
दक्षिण सोलापूर कुंभारी हद्दीतील गट नं : 653/1अ 2अ या ठिकाणी अवैधरीत्या मुरूम उपसा करणाऱ्यांवर पंचनामे करून कारवाई करा.
ह्युमन राईटस फेडरेशन ऑफ इंडियाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष सादिक शेख यांची सोलापूर जिल्हा अधिकारी व दक्षिण सोलापूर तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल.
सोलापूर जिल्ह्यातील शासनाच्या आदेशानुसार मुरूम उपसा बंद असताना शासनाला केराची टोपली दाखवत गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात मुरूमच्या बेकायदेशीर उपसा करून त्याची राजे रेसपणे वाहतूक केली जात असून राज्य सरकारच्या लाखो रुपयांचा महसूल बुडवत आहे.
अशा अवैधरीत्या मुरूम उपसा करणाऱ्यांवर पंचनामे करून कायदेशीर कारवाई करा अशी मागणी निवेदन द्वारे आज ह्यूमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सादिक शेख यांनी सोलापूर जिल्हा अधिकारी व दक्षिण तहसीलदार यांच्याकडे केली आहे़. त्यावेळी माध्यमांशी बोलताना सादिक शेख म्हणाले की दहा दिवसांच्या आत जर त्या ठिकाणी पंचनामे करून कारवाही नाही झाली तर यापुढे वरिष्ठांकडे याचा पाठपुरवठा करणार.
त्यावेळी ह्युमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सोलापूर शहर उपाध्यक्ष महबूब कादरी उपस्थित होते.


